पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी..

0
slider_4552

बाणेर :

विरोधी पक्ष नेते ना.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पॅनलने निवडणुक लढवली होती. काल झालेल्या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. आमदार अतुल बेनके, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, विरधवल जगदाळे यांच्या नियोजनामुळे प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले.

कार्यकारी मंडळ मधुन विरोधी पक्षनेते अजित पवार,
उपाध्यक्ष पदी संगिता सोनवणे व मोहिनी चाफेकर,
नियामक मंडळामधुन मधुकर नलावडे, शरद चव्हाण, जयवंत बोडके, एकनाथ वाळके, शकुंतला खटावकर, वासंती बोर्डे तर कार्यकारी मंडळ मधुन पुणे विभागात महिला विद्या पठारे, पिंपरी-चिंचवड महिला विभागात कविता आल्हाट, पुणे जिल्हा महिला ग्रामीण विभागात सुजाता समगिर हे सर्व प्रगती पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडुन आले होते.

अध्यक्ष पदी आमदार अतुल बेनके, उपाध्यक्ष पदी संजोय वाघीरे-पाटील, विरधवल जगदाळे व महादेव कोंढरे विजयी झाले.

कार्यकारी मंडळ मध्ये पुणेमनपा हद्दीमधुन विजयी उमेदवार :
योगेश यादव, संदिप पायगुडे, दत्तात्रय कळमकर, प्रकाश बालवडकर, किरण चांदेरे, राजेंद्र ढमढेरे, हनुमंत पवार, सागर गोळे, ऋुषिकेश मद्रासी, सागर खळदकर, महेंद्र धनकुडे, तुषार नागरगोजे, प्रविण पासलकर व सुनिल मोरे हे उमेदवार विजयी झाले.

महिला राष्ट्रीय खेळाडु मधुन विजयी उमेदवार :
शोभा शिंदे(भगत), सुजाता सपकाळ(जाधव) व सलमा शेख (पठाण) ह्या उमेदवार विजयी झाल्या.

पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतून विजयी उमेदवार :
दत्तात्रय झिंजुर्डे, दिपक धावडे, दत्तात्रय माने, प्रविण नेवाळे व शेखर रावडे हे उमेदवार विजयी झाले.

पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून विजयी उमेदवार : अनिल यादव, प्रकाश पवार, सुर्यकांत मुटके, राजेंद्र पानसरे व राजेंद्र काळोखे हे उमेदवार विजयी झाले.

See also  नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावतीने महिला दिनानिमित्त हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन.