नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावतीने महिला दिनानिमित्त हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन.

0
slider_4552

बालेवाडी :

महिला दिनाचे औचित्य साधून खास औंध बाणेर बालेवाडीकरांसाठी नगरसेवक अमोल बालवडकर, आशाताई बालवडकर आणि भाजपा सक्रिय महिला  यांच्या वतीने हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रुती मराठे या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्यांच्यासमवेत या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे सादरीकरण सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय करणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती देताना नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, आपल्या जीवनामध्ये महिलांचे महत्त्व फार आहे. आज घडीला प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर असून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये महिला करत असलेल्या कामाचा आदर व्हावा म्हणून रोजच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये उसंत काढून एक दिवस महिलांना स्वतःसाठी आनंदाने उत्साहाने भरलेला मिळावा, या हेतूने महिला दिनानिमित्त खास औंध बाणेर बालेवाडीकरांसाठी हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी विविध खेळ आणि उपक्रम राबवले जाणार असून आकर्षक भेटवस्तू देखील दिल्या जाणार आहेत. समस्त औंध बाणेर बालेवाडीकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

या हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमात डान्स, झुंबा, योगा, करमणूक, सर्व प्रकारचे खेळ, केक कटिंग, टॅटू, लाईव्ह म्युझिक, लाठी काठी, ड्रमसेट म्युझिक, स्केटिंग, मर्दानी खेळ, बालजत्रा, फोटो बूथ, बॉल डान्स, मलखांब, चार्लीन, जादूगार, जलगर, जोकर असे विविध प्रकारचे खेळ व करमणुकीचे उपक्रम राबवले जाणार आहेत.

विशेष म्हणजे या कार्यक्रमांतर्गत १० पैठणी सोबत ५ टॅब, ५ सायकल आणि लहान मुलांसाठी आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. दि. ६ मार्च रोजी हा कार्यक्रम वायदंडे क्रिकेट अ‍ॅकॅडमी नवीन महादजी शिंदे पुलाजवळ, डी-मार्ट जवळ, औंध येथे संपन्न होणार आहे. स्पर्धकांनी येताना आपल्या सोबत कुपन घेऊन येणे तसेच
“On The Spot” येणाऱ्या स्पर्धकांसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा कूपन मिळण्याची व्यवस्था केली आहे

अधिक माहितीसाठी संपर्क – 9256070707,9028790999

See also  बालेवाडी फाट्यावरील सेक्स रॅकेटचा भांडाफोड चतुःशृंगी पोलिसांची कारवाई.

टीप- सदर ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.