औंध :
औंध क्रिकेट क्लब आणि सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त “सनी करंडक २०२२” भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा औंध येथील इंदिरा गांधी प्राथमिक शाळा मैदानावर आयोजित केली होती. ही स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेच्या वेळी भारतीय जनता पार्टी आणि महा विकास आघाडी यांच्यामध्ये प्रदर्शनीय क्रिकेट सामना खेळविण्यात आला. जवळपास सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या सामन्यांमध्ये सहभाग घेतला. अतिशय रंगतदार झालेल्या सामन्यांमध्ये महा विकास आघाडीने एक धावेने निसटता विजय संपादन केला.
या प्रदर्शन या सामन्यासाठी संघ पुढीलप्रमाणे खेळला:
महा विकास आघाडी भारतीय जनता पार्टी
1.सुशिल लोणकर 1. दत्तात्रय गायकवाड
2.भारत जोरे 2. सनी निम्हण
3.राजेंद्र निम्हण. 3. अमोल बालवडकर
4.गणेश जावळकर 4. गणेश कळमकर
5.सचिन नखाते 5. प्रल्हाद सायकर
6.अतुल भोंडवे 6. सुप्रीम चोंधे
7.किशोर गराडे 7. अभिजीत गायकवाड
8.दीपक कलापुरे 8. शिवम बालवडकर
9.सचिन कलापुरे. 9. अथर्व गायकवाड
10.अजिंक्य इंगवले 10. सौरभ लहाने
11.अमर आढाळगे 11. गणेश कलापुरे
“सनी करंडक २०२२” विजेते
प्रथम क्रमांक (रू. ३५५५५ व भव्य चषक) – दौंड ११ (दौंड) या संघाने पटकावला हे पारितोषिक विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे व विश्वस्त, महेंद्र जुनवणे, सुप्रीम चोंधे, राहुल गायकवाड, गणेश कलापुरे, कैलास पवार आणि माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांक (रू. २५५५५ व भव्य चषक) – झुंझार ११(पिंपरी) या संघाने पटकावला हे पारितोषिक मस्जिद ट्रस्ट चे अल्लाउद्दीन पठाण, फयाज खान, हारूण सवार, महम्मद सय्यद, सतीश जगदाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तृतीय क्रमांक (रू. १५५५५ व भव्य चषक) – नॉकआऊट ११ (रुपीनगर) या संघाने पटकावला हे पारितोषिक ख्रिस्त मंडळ सदस्य, राहुल चव्हाण किरण अडांगळे दीपक सोनवणे मंगेश सोनवणे विकास सोनवणे, औंध गाव नुक्कड मित्र मंडळ अध्यक्ष निखिल सोनवणे, सत्यम अडागळे, महेश वैराट, चेतन सोनवणे, दर्शन अढागळे, प्रतीक सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
चतुर्थ क्रमांक (रू. १०५५५ व भव्य चषक) – ओम ११ (औंधगाव) या संघाने पटकावला हे पारितोषिक गणेश बोडके, गणेश कलापुरे, गणेश शेलार, सोमेश्वर स्पोर्ट क्लब, औंध स्पोर्ट क्लब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
मॅन ऑफ द सिरीज (रु २५५५ व ट्रॉफी) – अक्षय जाधव (ओम११ औंध) याने पटकावला हे पारितोषिक अजय काकडे राहुल शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
फायनल मॅन ऑफ द मॅच (रू.५५५ व ट्रॉफी)- अक्षय नागवडे (दौंड ११) याने पटकावला पारितोषिक सचिन नकाते अर्जुन कराळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट झेल (१५५५ व ट्रॉफी) – सिद्धार्थ पिसाळ (झुंजार ११ पिंपरी) याने पटकावला हे पारितोषिक कैलास पवार, अमोल रानवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट गोलंदाज (१५५५ व ट्रॉफी) – प्रकाश बनसोडे (दौंड ११) याने पटकावला हे पारितोषिक अमित मुरकुटे, पप्पू काशीद, अभिषेक परदेशी, टीकू दास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट फलंदाज (१५५५ व ट्रॉफी) – ऋतिक तारू (झुंजार११ पिंपरी) याने पटकावला हे पारितोषिक वीरेंद्र जूनवणे, प्रमोद कांबळे, महेंद्र जुनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सलग तीन षटकार (१५५५ व ट्रॉफी) – निखिल आरगडे (सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब सोमेश्वरवाडी) याने पटकावला हे पारितोषिक दीपक कलापुरे, योगेश जुनवणे, गणेश कलापुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शिस्तबद्ध संघ (१५५५ व ट्रॉफी) – एम्स हॉस्पिटल औंध या संघाने पटकावला हे पारितोषिक सुप्रीम चोंधे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.