आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते बावधन येथे घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

0
slider_4552

बावधन :

भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 14 मंदार अर्जुन घुले पाटील अध्यक्ष ग्रामविकास आघाडी मुळशी तालुका आणि कल्पना महेश घुले पाटील ग्रामपंचायत सदस्य बावधन बुद्रुक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना युवा नेते मंदार घुले यांनी सांगितले की, प्रभागातील नागरिकांना आपल्या अडचणी सोडविण्यात करता हक्काचे ठिकाण असावे या हेतूने नागरिकांशी संपर्क करता यावा या उद्देशाने जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहे. नागरिकांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त असणारे हे कार्यालय नेहमीच उपयोगी ठरणार आहे. या परिसरातील सर्व नागरिकांनी आपल्या अडीअडचणी आपली कामे आपले प्रश्न घेऊन हक्काने या कार्यालयामध्ये यावे ते सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

यावेळी बोलताना कल्पना महेश घुले पाटील यांनी सांगितले की, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन नागरिकांची सेवा करत आहोत. हि सेवा करतांना नागरीकांना समस्या सोडविण्यासाठी हक्काचे स्थान मिळावे यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, अतिशय भव्य अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे हे जनसंपर्क कार्यालय असुन त्याचे उद्घाटन झाले असे जाहिर करतो. या कार्यालयात नागरीकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याचे बारकाईने लक्ष दिले आहे. केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना मिळवून देण्याची मदत या जनसंपर्क कार्यालयातून होईल. या जनसंपर्क कार्यालय मार्फत जनतेची सेवा घडेल. जनतेच्या सेवेतून भारतीय जनता पार्टीच्या प्रसार मंदार घुले आणि कल्पना घुले करतील याची खात्री आहे.

यावेळी बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ, यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उत्कर्ष सर्वांगीण विकास प्रबोधनीच्या विस्तारासाठी देणगी देण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित उद्योजक समीर पाटील, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे, कोथरुड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, स्वाती मोहोळ, महाराष्ट्र राज्य प्रभारी भारती विनोदे, पुनितजी जोशी, राहूल कोकाटे, राजेंद्र बांदल, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, कांचन कुंबरे, मा. उपसरपंच वृषाली भुंडे, मुळशी तालुका शिवसेना महिला संघटक पौर्णिमा पडवळ, आशा भुंडे, गोरख दगडे, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, सचिन सुतार, ग्रामपंचायत सदस्य आझाद दगडे, सविता ताई दगडे, स्वाती ढमाले, माजी उपरपंच रंजना दगडे, रेश्मा खिलारे, रेश्मा केदारी, ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत भुंडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन दगडे, उपसरपंच दीपक दगडे, माजी उपसरपंच मयुर कांबळे समस्त ग्रामस्थ बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी भजनी मंडळ, आणि परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

See also  बालेवाडी येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन.