पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवरून आजारी असून देखिल बजावला मतदानाचा हक्क..

0
slider_4552

पुणे :

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवरून येऊन मतदानाचा हक्क बजावला. गिरीश बापट हे मागील काही दिवसांपासून आजारी असून ते उपचार घेत आहेत.

आज (रविवार) संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांनी अहिल्यादेवी शाळेत मतदान केले.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना गिरीश बापट यांनीच राजकारणात आणले होते. पण, त्यांच्याच निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आजारी असतानाही प्रचारासाठी उतरले होते. यावेळी ते बोलत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना गिरीश बापट म्हणाले होते, ‘1968 नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकून अनेक वेळा हरलो. पण पक्ष संघटन राहिले. ही निवडणूक चुरशीची नाही, ही निवडणूक आपल्या चांगल्या मतांनी जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनो चांगले काम करा, कर्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. असं ते म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. अगदी शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला होता.

चिंचवड मतदारसंघात ५०. ४७ टक्के मतदान झाले. तर कसबा मतदारसंघात ५०. ०६ टक्के टक्के मतदान झाले. २ मार्च ला निकाल जाहिर होईल.

See also  सहकार क्षेत्राचा केवळ राजकीय वापर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन