बावधन बुद्रुक येथे आरोग्य हजेरी कोठी अंतर्गत “स्वच्छोत्सव २०२३” स्वच्छता अभियान रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
slider_4552

बावधन :

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक येथे आरोग्य हजेरी कोठी अंतर्गत ” स्वच्छोत्सव २०२३” स्वच्छता अभियान ०७ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२३ या अनुषंगाने स्वच्छ्ता रॅली आयोजीत करण्यात आली होती.

या वेळी जनसुविधा फाऊंडेशन, प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट, स्वच्छ संस्था, सुर्यदत्ता कॉलेज आणि मामासाहेब मोहोळ कॉलेजचे विद्यार्थी यांच्या सहभागाने भुंडे वस्ती, बापुजीबुवा मंदिर संपुर्ण गावठाण परिसर याठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये स्वच्छता विषयी संदेश, कचऱ्याचे वर्गीकरण विषयी जनजागृती करून मारूती मंदीर येथे पथनाट्य सादर करण्यात आले,

सदर रॅली मध्ये स्थानिक नागरिकांनी, महिला तसेच बावधन बुद्रुक आरोग्य कोठी वरील सेवकवर्ग आरोग्य निरीक्षक हनुमंत चाकणकर, मोकादम राम गायकवाड, प्रकृती वेस्ट मॅनेजमेंटचे अर्जुन साठे, श्रीमती वाकणकर मॅडम स्वच्छ संस्थेच्या श्रीमती संध्या गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या वॄषाली भुंडे, सुर्यकांत भुंडे समस्त गावकरी मंडळी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

See also  पुण्यात आता हरणांची सहल !