पुणे :
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून मोबाईल हॅक करून २ जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये द्या म्हणून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.







या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) या दोघांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. हा प्रकार बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती देत असतांना म्हंटलंय, दोन दिवसांपूर्वी माझा मोबाईल हॅक करून अज्ञात इसमाने माझ्या जवळच्या मित्रांकडे पैसे मागितले होते. वारंवार फोन करून पाहण्यात आले त्यानंतर माझ्याशी मित्राचा संपर्क झाला आणि सगळं समजलं.
हे सगळं केल्यानंतर माझ्या दोन व्यवसायिक मित्रांना पैसे मागितले जात आहेत असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेला यांची माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन व्यक्ती ताब्यात घेतलेले आहे त्यांचा तपास केला जात आहे.







