कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुवर मिळवला 81 धावांनी विजय…

0
slider_4552

कोलकत्ता :

कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती फलंदाजीनंतर वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 मधील पहिला विजय मिळवला.

कोलकाताने पहिले बॅटिंग करताना 7 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी 17.4 षटकांत 123 धावांवर ऑलआऊट झाली. केकेआरचा हा या मोसमातील पहिला विजय तर आरसीबीचा पहिला पराभव ठरला. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं होतं.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने शार्दुल ठाकूरच्या ६८, रहमानउल्लाह गुरबाजच्या ५७ आणि रिंकू सिंगच्या ४६ धावांच्या जोरावर सात गडी गमावून २०४ धावा केल्या. बंगळुरूचा संघ १७.४ षटकांत १२३ धावांवर गारद झाला. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने चार, सुयश शर्माने तीन आणि सुनील नरेनने दोन गडी बाद केले. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. त्याचवेळी बेंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज, मायकेल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

See also  प्रथम मानांकित नोवाक जोकोविच व लाल मातीच्या बादशहा राफेल नदाल यांच्यात रंगणार उपांत्य फेरीचा सामना