भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सचिन मानवतकर यांच्या वतीने भित्तीचित्र रेखाटण्याचा उपक्रम…..

0
slider_4552

औंध :

भारतीय जनता पक्षाच्या ४४ व्या स्थापना दिवसानिमित्त औंध येथील कस्तुरबा वसाहत येथे भारतीय जनता पक्ष सदस्य सचिन मानवतकर यांच्या वतीने भित्तीचित्र रेखाटण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ कस्तुरबा वसाहत येथील सचिन मानवतकर यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे हा भित्तीचित्र रेखाटण्याच्या उपक्रम आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला.

यावेळी सिद्धार्थ शिरोळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले कमळ भिंतींवर रेखाटण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन- श्री सचिन मानवतकर (सदस्य-भाजपा) यांनी केले होते.

यावेळी रवींद्र साळेगावकर-अध्यक्ष शिवाजी नगर मतदारसंघ, गणेश बगाडे, मा.सुनील पांडे. सचिन वाडेकर. सुरज गायकवाड. आनंद छाजेड, विनोद धोत्रे, अपर्णा कुराडे. सौरभ कुडंलिक. अजय नागटिलक. सौ.कुभांर ताई. मा.पाटील साहेब. मनोज ठोसर. जुनेद सय्यद तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  सोमेश्वरवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनायक निम्हण यांना श्रद्धांजली  वाहत केले निम्हण कुटुंबाचे सांत्वन