भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा

0
slider_4552

पुणे :

भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे मतदारसंघ रिक्त झाला आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे.

भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे.

दुसरीकडे मविआकडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपकडून पुणे लोकसभा पटोनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट किंवा मुलगा गौरव बापट, पुण्याचे माजी महापैर मुरलीधर मोहळ, पुण्याचे माजी खासदार संजय काकडे, यांच्यासोबतच मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत होती. मात्र, गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर पुण्यात झळकले होते. त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांचे नाव देखील मागे पडले आहे. त्यामुळे आता भाजपकडून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे.

दुसरीकडे ‘मविआ’कडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांना पुण्याच्या पोटनिवडणुकीचे तिकीट दिले जाऊ शकते. शिवाय, मोहन जोशी यांचे नाव देखील चर्चेत आहेत. यामुळे कोणाला तिकीट मिळणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहेत.

See also  शहरातील पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय.