सोमेश्वरवाडी :
पुण्याचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांच्या ‘झुंज’ या सोमेश्वरवाडी येथील निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि निम्हण कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आबा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. परंतु ईश्वराच्या मनात जे आहे तेच घडते. स्वर्गीय विनायक (आबा) निम्हण यांनी जो अनेकांच्या मनावर ठसा उमटविला आहे तो कायम राहील. आबांच्या नंतर देखील सनी निम्हण आणि परिवारासोबत सदैव सोबत राहू.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन दळवी आणि कार्यकर्ते उपस्थित होते