नवले पुलावर भीषण अपघात तब्बल ४८ गाड्या धडकल्या…

0
slider_4552

पुणे :

पुण्यातील नवले पुलावर अपघात सत्र सुरूच आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास नवले पुलावर भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये 48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे.

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अजून तरी जखमींचा आकडा समजला नाही. मात्र अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना नवले रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

या घटनेची माहिती समजताचा घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी करण्यात आली. यावेळी अपघातात जखमींना नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे.

कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकूण 48 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे.

नवले पुलावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. नवले ब्रिजची ओळख सध्या अपघाती ब्रिज होतोना दिसत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत शेकडो लोकांना या अपघातांमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे.

See also  अतिक्रमणमुक्त फुटपाथ होण्यासाठी प्रयत्न करत आहे : पुणे महानगरपालिकेचे प्रशासन व आयुक्त विक्रमकुमार