महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत

0
slider_4552

मुंबई :

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्‍य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या इतर 11 सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, रविंद्र चव्हाण, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी या उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीची बैठक येत्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या समितीची ही पहिलीच बैठक होत आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक हे या बैठकी कडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

See also  मराठा जागर परिषदेचे नेते उपोषण कर्ते आझाद मैदान प्राध्यापक संभाजी पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश