राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली…

0
slider_4552

मुंबई :

राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट सुरू आहे. राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. गृह विभागाने मागील शुक्रवारी २७ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, आता आणखी २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये राजतिलक रोशन, राकेश ओला, समीर शेख यांच्यावर मुंबई पोलीस उपआयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत ४९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. मात्र, मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांना वगळता पोलीस दलात फारसा बदल केलेला नव्हता.

याचे कारण पूर्वीच्या सरकारमध्येही फडणवीस हेच गृहमंत्री होते व आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही गृहमंत्रीपद त्यांच्याचकडे आहे. दरवर्षी
सुट्टीच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येतात. त्यानुसार, पोलीस दलात खांदेपालट सुरु आहे.

यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तसेच उपायुक्त आणि समादेशक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही नवीन पदस्थापना करण्यात आली आहे.

प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :

राकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड ➝ पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, रायगड

महेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ➝ पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर

योगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड ➝ पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

बच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला ➝ समादेशक, रा.रा. पो.बल, गट क्र. 4, नागपूर

अर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ➝ पोलीस अधीक्षक, अकोला

मंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई ➝ पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर

राजातिलक रोशन – सहायक पोलीस महासंचालक, मुंबई ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

See also  शिवरायांची ‘ती’ वाघनखे लवकरच भारतात येणार, सातारच्या शिवाजी वस्तू संग्रहालयात विशेष दालन सज्ज

बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर ➝ पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

यतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ➝ पोलीस अधीक्षक, पालघर

सौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ➝ गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

मोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे ➝ पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा ➝ समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 9, अमरावती

निलेश तांबे – गुन्हे अन्वेषण, नागपूर ➝ पोलीस अधीक्षक, बुलढाणा

समीर शेख – पोलीस अधीक्षक, सातारा ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

तुषार दोषी – पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, सातारा

सोमय मुंडे – पोलीस अधीक्षक, लातूर ➝ पोलीस उप आयुक्त, संभाजीनगर परिमंडळ 1

जयंत मीणा – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, लातूर

नितीन बगाटे – उप आयुक्त, संभाजीनगर ➝ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

रितू खोकर – अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली ➝ पोलीस अधीक्षक, धाराशिव