पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन तुंबल्याने बाणेर बालेवाडीतील रस्ते जलमय…

0
slider_4552

बाणेर :

बाणेर बालेवाडी परिसर स्मार्ट सिटी ओळखले जाते. या नुसत्या नावाला असलेल्या स्मार्ट सिटी मध्ये एकही पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन पूर्ण नसल्याने नागरिकांना अवकाळी पावसातच पालिका प्रशासन कामाची पोलखोल झालेली पाहावयास मिळते. येथील कामे पूर्ण नसल्याने मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्ते जलमय झाले होते.

या स्मार्ट सिटी मध्ये प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात बोट फिरण्यासाठी द्यावी अशी प्रतिक्रिया आहे समाज माध्यमावर फिरत होत्या. स्मार्ट सिटी च्या नावाखाली मोठमोठे बजेट मोठमोठे कामे देखाव्यासाठी केली गेली परंतु पावसाळी लाईट व ड्रेनेज लाईन चा मात्र या परिसरात चांगलाच बाजार उठला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसात तर रस्ते जलमय होतातच पण पाऊस नसल्यावरही अनेक ठिकाणी रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळते.

यामध्ये प्रामुख्याने बालेवाडी फाटा मुख्य रस्ता, बिटवाई चौक, जुपिटर हॉस्पिटल, शिवनेरी पार्क, ओमेगा रेसिडेन्सी रोड, बाणेर मुख्य रस्ता, बाणेर पाषाण लिंक रोड, सुस रोड बालाजी चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना पाहावयास मिळाले. या ठिकाणावरील लेणी जाईन व पावसाळी लाईन कडे मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येत आहे. नेमकी ही कामे क्षेत्रीय कार्यालय करणार की मुख्य कार्यालय याबाबत अद्यापही संभ्रम अवस्था आहे.

 

See also  बाणेर येथील आदित्य इंग्लिश मिडियम स्कूल, 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा…