औंध :
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी ही प्राथमिक जबाबदारी आहे. असा विचार घेऊन भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांनी औंध भागातील नागरिकांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या दोन दिवसीय आरोग्य शिबिरात एकूण 200 नागरिकांनी लाभ घेतला. दातांची तपासणी, रक्ततील सर्व घटक तपासणी, रक्ततील साखर तपासणी, डोळे तपासणी, महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अश्या विविध प्रकारच्या तपासण्या मोफत उपलब्ध होते.
या वेळी माजी नगरसेवक प्रकाशजी ढोरे,भाजपा पुणे शहर उपध्यक्ष सुनील पांडे, औंध जेष्ठ नागरिक संघचे अध्यक्ष सूर्यकांत अण्णा कलापुरे, बाबासाहेब मदने, रमेश कडूसकर, रमेश चोंधे, श्रामदास भाडाळे, शशिकांत रानवडे,गणेश कलापुरे, किरण ओरसे, रोहन कोकाटे, विकास डाबी, सागर मदने, चेतन मुठे, सुनील शिवतारे, अमित चौरसिया, रोहन रानवडे, हेमंत पांचाळ, हरीश रुणवाल, संजयजी मोरे, राजेंद्र उर्फ बाबू भोर, अविनाश लोंढे, आकाश ढोणे, शशिकांत नाईक, इरफान शेख उपस्तिथ होते.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे म्हणूनचं हे आरोग्य शिबीर मी आयोजित केला असं सौरभ कुंडलिक यांनी सांगितले.