औंध :
त्रिभाषा सूत्रांतर्गत पहिली पासून हिंदी शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला असून, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार औंध, औंध रोड,खडकी स्टेशन परिसरातील नामवंत शाळांना राजसाहेब ठाकरेंचे हिंदी भाषे विरोधाचे पत्र देण्यात आले.
शाळांच्या मुख्याध्यापकांना भेटून सदर पत्र देण्यात आले, व अभ्यास क्रमात पहिली पासून हिंदी सक्तीबाबत जो विरोध आहे, त्याबाबत राजसाहेबांची व पक्षाच्या भूमिके बाबत चर्चा करण्यात आली. या चर्चे दरम्यान चिंता व्यक्त करीत, पहिलीतूनच तीन भाषा शिकवल्याने विद्यार्थ्यांवर ताण येतो, असेही काही मुख्याध्यापकांनी मान्य केले.
सदर पत्राची प्रत देताना मनसे शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे, अमर आढाळगे, जितेंद्र कांबळे, तसेच यश सोनवणे, राहुल घडसिंग यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.