औंध :
३८ औंध रोड येथील भाऊ पाटील पडळ कडे जाणाऱ्या मार्गावर पथदिव्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. विद्युत खांब पूर्ण पणे गंजला असून तुटलेल्या परिस्थितीत आहे. यामुळे हा विद्युत लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे व अवकाळी पाऊसामुळे सदर विद्युत खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एखादी जीवितहानी झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल याची प्रशासनाला कल्पना असावी. प्रशासनाने सदर विद्युत खांब जो पडण्याच्या अवस्थेत आहे, तो लवकरात बदलून मिळावा व सर्व विद्युत थांबांवरील विद्युत दिवे सुरू केले नाही, तर औंध क्षेत्रीय कार्यालयत प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यात येईल.असा इशारा मनसे स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे यांनी दिला.