मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे आंतराष्ट्रीय योगा दिन साजरा…

0
slider_4552

पुणे :

आंतराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी या कार्यक्रमात अत्यंत उत्साहाने सहभागी झाले, महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी शिवशंकर रेकुंटवार योगा प्रशिक्षक, व समुपदेशक आहेत यांनी या प्रसंगी आसनाचे प्रात्यक्षिक व मेडिटेशन चे प्रशिक्षण दिले.

सदर च्या कार्यक्रमास प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, संस्थेचे सचिव प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी मार्गदर्शन केले, उपप्राचार्या डॉ ज्योती गगनग्रास यांनी समन्वयक म्हणून काम केले.

See also  छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबतच्या विषयात आठ दिवसात निर्णय : महापौर मुरलीधर मोहोळ