श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योग दिन उत्साहात साजरा

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सर्व शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगशिक्षक म्हणून विभागीय अध्यक्ष रवींद्र मराठे, भारतीय योग संस्थान पुणे.  त्यांनी सर्व शिक्षकांना प्रथमतः योगाचे महत्त्व समजावले रोजच्या दिनचर्येमध्ये योग किती महत्वपूर्ण आहे, आणि योग करणे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे याविषयी माहिती दिली.

त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये योग करणे व त्याचे महत्त्व सर्व शिक्षकांना सांगितले. यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे तसेच सेक्रेटरी विराज धनकुडे, ट्रेझरर राहुल धनकुडे, सीईओ सुषमा भोसले तसेच आदित्य ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य कोमल शिंदे व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य रेखा काळे उपस्थित होत्या.  रेखा काळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

See also  अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एसकेपी कॅम्पस ची अजित आकांक्षा स्कॉलरशिप योजना सुरू.