औंध :
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर व माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते सचिन मानवतकर यांच्या वतीने कस्तुरबा वसाहत येथील जनसंपर्क कार्यालया मध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील औंध – बालेवाडी मधील सर्व सफाई कामगारांना भेटवस्तू व मिठाई वाटप करण्यात आली.




या कार्यक्रमाची माहिती मॅकन्यूज ला देताना युवा नेते सचिन मानवतकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे, परिसरातील नागरिकांच्या सेवेतून आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस साजरा व्हावा या त्यांच्या विचारांची कास धरत औंध बाणेर बालेवाडी परिसरातील सफाई कामगारांसाठी मिठाई व भेटवस्तू दिल्या आहेत. साफ सफाई कामगार आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरता फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या ह्या कामाचा आदरपूर्वक सत्कार व्हावा या हेतूने भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सफाई कामगारांनी आम्ही दिलेल्या मिठाई व भेटवस्तू स्वीकार करून आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे चौधरी साहेब, पांडुरंग निम्हण, कुलकर्णी, काका कांबळे, शारदा पुनावळे, सौ. कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.









