राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त योगेश सुतार यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन…

0
slider_4552

सुतारवाडी :

योगेश सुतार युवा मंच व विश्व सेवा आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस योगेश सुतार यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक १४ पाषाण, सुतारवाडी,  सोमेश्वरवाडी, बावधन, पंचवटी मधिल नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक १२/०६/ २०२२ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत योगेश सुतार जनसंपर्क कार्यालय  सुतारवाडी येथे होणार आहे.

या शिबिराची माहिती देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस योगेश सुतार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून प्रभाग क्रमांक १४ च्या नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप आणि गोरगरिबांसाठी मोफत औषधोपचार होणार असून इतर अनेक सुविधा शिबिर अंतर्गत मिळणार आहेत नागरिकांना विनंती आहे या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या डोळ्यांची निगा राखण्यासाठी या शिबिरात सहभागी व्हावे.

शिबिराचे वैशिष्ट्ये :
• पुणे येथील प्रसिद्ध एस.पी. देशपांडे आय हॉस्पिटल येथील नेत्र तज्ञ डॉक्टर व सहकार्याकडुुन नेत्र तपासणी
• शिबीरातील व्यक्तीची लांबच्या चष्मा नंबरासाठी कॉम्प्युटरने नेत्र तपासणी.
• डायबेटीस असणार्या व्यक्तीची विशेष डोळे तपासणी व मार्गदर्शन.
• गरजुंना मोफत औषध / उपचार व फ्रि फॉलोअप.
• सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा.
• चष्मे वाटप *गरिबांना मोफत औषध उपचार.

स्थळ :
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस
योगेश रोहिदास सुतार
जनसंपर्क कार्यालय
माऊंट व्हर्ट ब्लू बेल्स ओरा शॉपनं. ०७/०८
सुतारवाडी, पाषाण, पुणे –४९१०२१

See also  सुसगाव यात्रेनिमित्त अतिरिक्त पाणी पुरवठा पालिकेने करावा डॉ. दिलीप मुरकुटे यांनी पालिकेला दिले निवेदन