पेपर विक्रेत्याच्या कुटुंबीयांना अमोल बालवडकर यांची एक लाख रुपयांची मदत

0
slider_4552

बालेवाडी :

बाणेर-बालेवाडी येथील वर्तमानपत्र विक्रेता कै.महेश चौधरी यांच्या ४ महिन्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी कर्तव्य म्हणून अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज कै. महेश यांचा मुलगा चि. सर्वज्ञ याच्या नावाने १ लक्ष रुपयांची FD करून त्यांच्या पत्नीला हस्तांतरित केली व सर्वज्ञ ची शैक्षणिक जबाबदारीही स्वीकारली. आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत गरजुंच्या मदतीला धावून आपल्या नेत्याचा वाढदिवस सत्कारणी लावण्याचे मौल्यवान व प्रेरणादायी काम माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून होत आहे.

याची माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, आपण ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो त्यातील प्रत्येक घटकापर्यंत आपले सहकार्य पोहोचले पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सामील झाले पाहिजे अशी शिकवण नेहेमीच आमचे नेते महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे आम्हा सर्वांना देत असतात. दादांच्या माध्यमातून ही कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अनेक गरजूंना अनेक प्रकारे मदत मिळत असते..

याच विचारांची कास धरून चंद्रकांत दादांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स, जाहिरात खर्च टाळून खऱ्या अर्थाने सामाजिक काम करण्याचा निर्णय अमोल बालवडकर फाऊंडेशन ने घेतला आहे.

बाणेर बालेवाडी येथील वर्तमान पत्र विक्रेता महेश वसंत चौधरी(वय ३२) यांचे काही दिवसांपूर्वी अल्पवयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, कै. महेश हे अतिशय कष्टाने आणि जिद्दीने आपल्या परिवाराची उपजीविका भागवण्यासाठी वर्तमान पत्र विक्रीचा व्यवसाय करत होते. घरातील कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणुन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अमोल बालवडकर फाऊंडेशन कडुन कै. महेश यांचा मुलगा चि. सर्वज्ञ याच्या नावाने १ लक्ष रुपयांची FD करून त्यांच्या पत्नीला हस्तांतरित केली, तसेच सर्वज्ञ याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी अमोल बालवडकर फाऊंडेशनने घेतली आहे.

या प्रसंगी शशिकांत बालवडकर, प्रवीण बालवडकर, रोनक गोटे, सुमित कांबळे, बाबुराव गीते व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

See also  बाणेर बालेवाडी मध्ये काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जीवन चाकणकर यांच्या माध्यमातून होणार.जीवन चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.