पुणे :
पुणे जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर येथे दिनांक ०८/०६/२०२२ रोजी, पुणे बार असोसिएशन तर्फे प्रसिद्ध हास्यकलाकार मकरंद टिल्लू यांचा ‘हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा’ हा तुफान विनोदी कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी वकीलांनी मनमुराद हसण्याचा आनंद लुटला. पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड.थोरवे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ऍड. थोरवे यांनी वकीलांना रोजच्या कोर्ट कामाच्या धावपळीतुन स्वतःसाठी थोडासा वेळ काढून हसले पाहिजे व आनंदी राहून काम केले पाहिजे. असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी विष्णु तापकीर, जयश्री काळे पालवे, एकनाथ सुगावकर, गंधर्व कवडे, सोळंकी यांचा सन्मान असोसिएशन तर्फे करण्यात आला. सदर कार्यक्रमास पुणे बार असोसिएशन ची कार्यकारिणी तसेच मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशन चे सचिव ऍड. अमोल शितोळे यांनी केले व आभार कार्यकारिणी सदस्य ऍड. अजय नवले यांनी मानले.
सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष – ॲड. विवेक भरगुडे, लक्ष्मण येळे पाटील, सेक्रेटरी – ॲड. सुरेखा भोसले, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम कार्यकारिणी सदस्य – ऍड. काजल कवडे, ॲड.अर्चिता जोशी, ॲड. तेजस दंडगव्हाळ, ॲड. अमोल दुरकर, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते