बाणेर :
बाणेर गावातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते जीवन चाकणकर आणि वृषाली जीवन चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज पुणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. बाणेर बालेवाडी मध्ये काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जीवन चाकणकर यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे.




यावेळी बोलताना पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, जीवन चाकणकर सारखा युवा कार्यकर्ता या भागांमध्ये काँग्रेसला मिळाला आहे. लोकांमध्ये मिसळून सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांची जाण ठेवून काम करणारा तरुण कार्यकर्ता अशी ओळख जीवन चाकणकर यांची आहे. जनसंपर्क कार्यालय हे सामान्य जनतेचा आधार जनसामान्यांचे प्रश्न सोडणारे केंद्र बनावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी जीवन चाकणकर यांच्याकडून व्यक्त केली. बाणेर बालेवाडी भागातील नागरिक महाविकास आघाडीकडे मोठ्या उमेदीने पाहात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की जीवन चाकणकर व वृषाली चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असून या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चाकणकर कुटुंबीयांनी प्रयत्न करावे. त्यांच्यासाठी आवश्यक ती ताकद काँग्रेस पक्ष निश्चित उभारेल. तसेच पुढील काळात लवकरच या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवणार आहे. राज्याचे मंत्री बोलावून त्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी प्रतिक्रिया देताना जिवंत चाकणकर यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने जनसंपर्क कार्यालय केले आहे. काँग्रेस पक्षाचे वाढ या भागांमध्ये करण्याचे काम करणार आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण ठेवून त्या सोडविण्याचे काम पुढील काम करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर, शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, सचिन बाराटे, दत्ता जाधव, शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे, बबन चाकणकर, राहुल वंजारी, अर्जुन चाकणकर, नारायण चाकणकर, दयानंद चाकणकर, सोमनाथ चाकणकर, नितीन चाकणकर, तसेच महा विकास आघाडीचे कार्यकर्ते, यंग स्टार ग्रुप सभासद, मोठ्या प्रमाणावर महीला वर्ग यावेळी उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बांगर यांनी केले तर आभार बबनराव चाकणकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन जीवन चाकणकर आणि वृषाली जीवन चाकणकर यांनी केले.









