सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा जून महिन्यापासून

0
slider_4552

पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२२-२३) अंतिम सत्राच्या परीक्षा जून महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आले आहे.

याविषयीची मार्गदर्शक तत्वे आणि सूचना मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील उन्हाळी सत्रात पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. अभ्यासक्रमानुसार त्या त्या विषयांची वेळापत्रक विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in या
संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे नियोजन हे महाविद्यालय स्तरावर तर अन्य नियोजन हे विद्यापीठ स्तरावर केले जाणार असल्याचे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज वेळेत भरावेत असेही आवाहन विद्यापीठ परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा या २ ते ३० मे या कालावधीत होतील तर जून महिन्यापासून लेखी परीक्षेला सुरुवात होईल.

See also  पुणे शहर व जिल्ह्यात होळी  व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई.