जागतिक तिरंदाजी विश्‍वकप मध्ये भारतीय तिरंदाज प्रथमेश जावकर व अवनीत कौर चा अंतिम फेरीमध्ये प्रवेश

0
slider_4552

तिरंदाजी :

जागतिक तिरंदाजी विश्‍वकप मध्ये भारताचे तिरंदाज प्रथमेश जावकर व अवनीत कौर हे उत्तम कामगिरी करत आहे.

त्या दोघांनीही वैयक्तिक कंपाऊंड प्रकाराची उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघांनीही अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक प्रकारामध्ये आता त्यांना पहिले पदक जिंकता येणार आहे. एकीकडे रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटामध्ये अपयश आल्यामुळे कंपाऊंड प्रकारात भारतीयांनी अचूक बाण सोडला.

प्रथमेश जावकर हा १९ वर्षाचा आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढाईमध्ये दक्षिण कोरियाच्या योंगही चोई याच्यावर १४९-१४८ अशी मात केली आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. आता त्याच्यासमोर अंतिम फेरीमध्ये इस्तोनियाच्या रॉबिन जातमा याचे आव्हान असणार आहे. अवनीत कौर ही १८ वर्षाची आहे. तिने अव्वल मानांकित कोरियाची ओह युह यून हिच्यावर रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अवनीत हिने मेक्सिकोच्या डॅफने क्विनटेरो हिच्यावर १४७-१४४ अशी मात केली आणि पदक पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

See also  टी ट्वेण्टी वर्ल्ड कप नंतर विराट कोहली टी ट्वेण्टी क्रिकेट चे कर्णधार पद सोडणार