पुणे :
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळा असून या शाळेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालू होते. सदरील वर्ग चालवण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेने नेमलेल्या संबंधित संस्थेकडे दिली होती. परंतु महापालिकेसोबत काम करणाऱ्या काही संस्थांनी आपण काम करण्यास इच्छुक नसल्याचे कळविले असून आता हे वर्ग अचानकपणे बंद करण्यात आले आहेत.







याबद्दल माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की, वर्ग अचानकपणे बंद करण्यात आल्याने बोपोडी, चिखलवाडी आणि औंध येथील प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे समजताच आज मी पुणे मनपाच्या शिक्षणाधिकारी मा. मीनाक्षी राउत यांची भेट घेतली व कोणत्याही विद्यार्थी – विद्यार्थिनींना शालेय प्रवेशापासून वंचित राहू नये याची खबरदारी पुणे मनपा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबत मी पुणे मनपा आयुक्त मा. विक्रम कुमार जी यांचेशी सुद्धा बोलणे केले असून त्यांनी सुद्धा कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि असे आश्वासन मला दिले आहे.
यावेळी माजी उपमहापौर मा. सुनिताताई वाडेकर, मा. आनंद छाजेड, आदि उपस्थित होते.








