अहमदाबाद :
गुजरातमध्ये महावादळ बिपरजॉयने प्रचंड कहर केला आहे. या वादळामुळे गुजरातच्या कच्छमध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब कोसळले आहेत. रस्त्यावर प्रचंड पाणी भरले आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. द्वारकातही प्रचंड वेगाने वारे वाहत असून प्रचंड पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जागोजागी वृक्ष, विजेचे खांब आणि होर्डिंग्ज कोसळल्या आहेत. प्रशासनाने आधीच सर्व तयारी केली होती. त्यामुळे मोठं नुकसान झालं नाही. मात्र, बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये हाहा:कार उडालेला आहे.
राज्याला बिपरजॉय वादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज 6 जून रोजी वर्तवण्यात आला होता. त्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. 74 हजार लोकांना लोकांची शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ज्या परिसराला वादळाचा फटका बसणार आहे. त्या परिसरात मोठी खबरदारी घेतली होती. एअरक्राफ्टपासून शिप्सपर्यंत सर्वकाही तयारी होती. तरीही या वादळाने गुजरातच्या अनेक भागात हाहा:कार उडवला आहे.
या वादळामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली होती, त्यामुळे मोठी मनुष्यहानी टळली.