आयटी इंजिनियरची १६ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक

0
slider_4552

पिंपरी :

यु ट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्यास सांगितले. त्यानंतर ट्रेडिंगच्या बहाण्याने आयटी इंजिनियरची १६ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. टीसीएस कंपनी, हिंजवडी फेज तीन येथे ११ एप्रिल रोजी ही घटना घडली.

विश्वजित कुमार उपेंद्र झा (वय ३२, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी इंजिनियर असलेले फिर्यादी हे त्यांच्या ऑफिसमध्ये असताना त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला.

तुम्ही तुमच्या पगाराव्यतिरिक्त घरी बसल्या रिकाम्या वेळेत पैसे कमवू शकता, असे आमिष दाखवून युट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्यास सांगितले. सुरुवातीला त्याचे १५० रुपये आरोपीने फिर्यादीस दिले. त्यानंतर फिर्यादीस टेलिग्रामवरील लिंक पाठवून ट्रेडिंगसाठी पैसे भरण्यास भाग पाडून त्यांची १६ लाख ८४ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे तपास करीत आहेत.

See also  ‘कोविडशिल्ड’चे पाच कोटी डोस भारताला सर्वात आधी मिळणार – अदर पुनावाला.