बालेवाडी हाउसिंग फेडरेशनचे पाण्यासाठी पाण्यात भिजून आंदोलन…! 

0
slider_4552

पाणी व इतर नागरी सुविधांसाठी प्रशासना विरोधात घोषणा देत निषेध नोंदवत सोसायटीतील आंदोलक उतरले रस्त्यावर.

बाणेर :

बालेवाडी फाटा येथे बालेवाडी हौसिंग फेडरेशनच्या वतीने नागरी पाणी व इतर नागरी समस्या सोडवण्यासाठी भर पावसाच्या पाण्यात भिजून पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करून प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपस्थित सोसायटीतील नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणे विरोधात घोषणाबाजी केली. जवळपास पावसामध्ये नागरिकांनी एक तासभर उभे राहून हे आंदोलन केले.

यावेळी टँकर पासून मुक्ती मिळालीच पाहिजे, स्मार्ट सिटी इट्स जोक, अतिक्रमणाला पाठीशी घालणाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे, ये पब्लिक है सब जानती है, असे बॅनर दर्शवून घोषणा देण्यात आले. सोसायटींना अजुनही पुरेसं पाणी मिळत नाही. रस्त्यांच्या समस्येवर देखील पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीला संपुर्ण माहिती दिली आहे. परंतु त्यांचा प्रतिसाद शून्य आहे. स्मार्ट सिटी व पुणे महापालिकेचे अधिकारी रस्त्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवितात. नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी काही न करता बंद केल्या जातात, असेही आंदोलना प्रसंगी नागरिकांनी सांगितले.

टँकर मुक्त बालेवाडी मे – २३ च्या मध्यावर करण्याची घोषणा मनपा अधिकाऱ्यांनी उद्घाटने केली परंतु अजूनही अनेक सोसायटींना टॅंकर पाणी विकत घ्यावे लागते. या बाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला. या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग येणार की नाही, समस्या सुटणार नसतील तर भविष्यकाळात यापेक्षाही मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल असेही याप्रसंगी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

 

 

 

 

 

See also  विधान परिषद उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुण्यात प्रबोधनकार विचार साहित्य संमेलन समितीवरील नियुक्तीपत्र वाटप