बाणेर बालेवाडीती नागरी समस्यांबाबत जन आंदोलन…!

0
slider_4552

जनआंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

बाणेर :

बालेवाडी हौसिंग फेडरेशनच्या वतीने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने मनपा अधिकाऱ्यांशी निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून पाठपूरावा केला जात आहे. वारजे ते बालेवाडी अशी पाईपलाईन टाकल्या गेली. परंतु सोसायटींना अजुनही पुरेसं पाणी मिळत नाही. रस्त्यांच्या समस्येवर देखील पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीला संपुर्ण माहिती दिली आहे. परंतु त्यांचा प्रतिसाद शून्य आहे. या नागरिक समस्या सोडवण्यासाठी शनिवार दि.२४/०६/२३ रोजी सायंकाळी ५.३० वा. बालेवाडी फाटा येथे जन आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याची आवाहन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी प्रश्नाबरोबरच अर्धवट रस्ते, फूटपाथ नसणे अथवा तुटलेले फूटपाथ, अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते व त्याची वेळेवर दुरुस्ती न होणे, बऱ्याच ठिकाणी कचरा साठणे व तो वेळेवर न उचलणे, फूटपाथवर झालेले अतिक्रमण, काही ठिकाणी रस्त्यावर पडलेले केबलचे जाळे अशा समस्यांनी बालेवाडी येथील नागरिक त्रासलेले आहेत. स्मार्ट सिटी व पुणे महापालिकेचे अधिकारी रस्त्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवितात. नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी काही न करता बंद केल्या जातात.

टँकर मुक्त बालेवाडी मे – २३ च्या मध्यावर करण्याची घोषणा मनपा अधिकाऱ्यांनी उद्घाटने केली परंतु अजूनही अनेक सोसायटींना टॅंकर पाणी विकत घ्यावे लागते. या बाबत नागरिकांमध्ये रोष आहे. मनपा, स्मार्ट सिटी आणि संबंधित सरकारी यंत्रणेचं लक्ष वेधण्यासाठी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे शनिवार दि.२४/०६/२३ रोजी सायंकाळी ५.३० वा. बालेवाडीतील पाणी प्रश्न व नागरिसुविधा साठी बालेवाडी हौसिंग फेडरेशनच्या वतीने बालेवाडी फाटा, बाणेर येथे आंदोलन केले जाणार असल्याचे फेडरेशनच्या सभासदांनी सांगितले.

 

See also  पुण्यात आता हरणांची सहल !