नागपूर :
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. यामुळे प्रवाशी वाहतूक करणाच्या गाड्यांवरील चालकांची डोळे तपासणी केली जाणार आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी नागपूर प्रादेशिक परिवहन विभागानं हा उपक्रम हाती घेतला आहे.
बुलडाणा येथे बस अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. शिवाय समृद्धी महामार्गावर रोजच अपघात होत आहेत. वाहन चालकांचं व्हीजन कमी झाल्यानं अनेक अपघात झाल्याची बाब समोर आल्या आहेत. यामुळे आरटीओकडून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
सुरु केल्या आहेत. यातीलच एक भाग म्हणून चालकांच्या डोळे तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे.
निशुल्क चष्माही देणार बस, ट्राव्हल्स, मिनी बसमध्ये प्रवाशी वाहतूक करणाच्या सर्व चालकांचे डोळे तपासणी आणि काही समस्या असल्यास उपचारही केले जाणार
आहे. त्यामुळे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकाची डोळे तपासणी करुन त्यांना निःशुल्क चश्मा दिला जाणार आहे.