पुणेकरांना मिळणार आता सातही दिवस पाणी; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

0
slider_4552

पुणे :

महापालिकेने शहरासाठी लागणाऱ्या पाण्याचे
नियोजन करताना मे महिन्यापासून दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती. दरम्यान, जुलैे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने पाणी कपात रद्द करण्याची मागणी सुरू होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पाण्याबाबत
आढावा बैठक घेतल्यानंतर पाणी कपात रद्द केल्याची
घोषणा केली. त्यामुळे पुणेकरांना सातही दिवस पाणी
मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर्षी पाऊस उशिराने व सर्वसाधारण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामूळे पाणी साठ्याचे
नियोजन 31 ऑगस्टपर्यत करण्याचे आदेश राज्य शासनाने
महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार, महापालिका
प्रशासनाने 18 मेपासून दर गुरुवारी पाणी कपात सुरु केली
होती. या पाणी कपातीद्वारे महापालिकेने अर्धा टीएमसी पाण्याची बचत केली होती. दरम्यान, जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने खड़कवासला धरण साखळीमधील धरणातील पाण्याच्या साठ्यातही वाढ़ होऊ लागली, तर खडकवासला धरण 96 टक्के भरले आहे.

या पाश्वभूमीवर, विविध राजकीय पक्ष, सामाजिक व
स्वयंसेवी संघटना यांनी पाणी कपात रद्द करावी, अशी
मागणी महापालिका आयुत्त विक्रम कुमार यांच्याकडे केली
होती. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शनिवारी
दुपारी पाण्याबाबतच्या आढावा बैठकीकड़े सगळ्यांचे लक्ष
लागले होते. त्यानुसार या बैठकीत पाणीकपात रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीत शहरासाठी लागणारे पाणी आणि शेतीसाठी चे पाणी पुरवठा यासाठी
उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात आली. शेती, तलावांसाठी
पुरेस पाणी देण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री पाटील यांनी
दिले. तसेच खबरदारी म्हणून ६० दिवसांनी पुन्हा पावसाचा
व उपलब्ध पारणीसाठ्याचा आढावा घेतला जाणार आहे.
त्यानंतर आवश्यकते नुसार पाणी कपातीचा निर्णय घेण्यात
येईल. तसेच उद्यापासून पाणीकपात आता रद्द करण्यात
येणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली.

See also  शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा केवळ एकच शिफ्टमध्ये : वकिलांची नाराजी