अलसुफ़ा दहशतवादी प्रकणात चौथी अटक; संशयित रत्नागिरीतला, “एटीएसकडून कसून तपास सुरु

0
slider_4552

पुणे:

अल सुफा दहशतवादी प्रकरणामध्ये एटीएसच्या पुणे पथकाने आज आणखी एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणात झालेली ही चौथी अटक असून संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातला असल्याची माहिती मिळतेय. आरोपींनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेकी केल्याचा आणि जंगलामध्ये काही प्रात्यक्षिकं घेतल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या पुर्ण पथकाने आज अटक केलेला चौथा आरोपी रत्नागिरीतला आहे. त्याला एटीएसने काल चौकशीसाठी बोलावलं होतं. यापूरवी मध्य प्रदेशच्या दोन जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्यात मोहम्मद युनूस आणि मोहम्मद इम्रान यांचा समावेश आहे. या दोघांना पुण्यात आश्रय देणारा अब्दुल कादीर; हे तिघे एटीएसच्या ताब्यात आहेत. यांना फंडिंग कुठून मिळते, याचा शोध सुरु असतांनाच चौथा संशयित आरोपी एटीएसच्या ताब्यात आला आहे.

दरम्यान, 26\11च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतल्या छाबडा हाऊसला लक्ष्य करण्यात आलेलं होतं. ति्थेच पुन्हा रेकी झाल्याचा संशय आहे. पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कुलाब्यातील छाबड हाऊस असल्याची चचों आहे. दरम्यान दहशतवादी पथक छाबड हाऊसमोर दाखल झालेलं आहे. पुणे पोलिसांनी इम्रान आणि युनूस या दोघांकडून जिवंत काडतुसासह ड्रोन बनवण्याचं सामान जप्त केले होते. या दोघांकडे छाबड हाऊसचे फोटो सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढ़े आणखी काय खुलासे होतात, हे स्पष्ट होईल.

See also  नवीन शिक्षण धोरण राबविण्याशी संबंधित शाळांमध्ये पूर्ण कृती आराखडा जाहीर