चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर ! 

0
slider_4552

गणेशोत्सवासाठी मुंबईतून 2 हजार, तर रत्नागिरीतून 1 हजार 550 गाड्यांचे नियोजन

मुंबई :

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याकालावधीत लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबईतून २ हजार २०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून १ हजार ५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यत २७९गाङ्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिली.

माळनाका येथील विभागिय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, रल्नागिरी विभागातील नऊ आगारातून बोरीवली, मुंबई, ठाणे, विठ्ललवाडी, नालासोपारा, विरार, भांड्रप, भाईदर, पुणे मार्गावर जादा गाङ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रूप बुकींगच्या बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानक तसेच खासगी आरक्षण केंद्राकडे आरक्षण सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल ॲपव्दारे प्रवाशांना ऑनलाईन आरक्षणही करता येईल. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

१९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने १५ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे आगमन होणार आहे. २३ पासून परतीसाठी एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. परतीसाठी २७९ गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. दापोली आगारातून २० खेड १५०, चिपळूण २३०, गुहागर २६০, देवरूख १८०, रत्नागिरी१५०, लाजा १३०, राजापूर १७०, मंडणगड आगारातून ८० मिळून अशा एकूण १५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावातून थेट बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी गावागावांतील सरंपचांशी संपर्क साधून ग्रुप बुकिंग सुविधेबद्दल माहिती दिली जाणार आहे.गाड्यांच्या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभागनियंत्रक बोरसे यांनी दिली.

See also  ओबीसी आरक्षणावरील मागासवर्ग आयोगाचा अंतरीम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला