दिल्ली :
दिल्लीतील रस्ता सुरक्षा जागरुकता मोहिमेत कैंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गड़करी यांनी देशातील रस्ते आपघाताबद्दल खंत व्यक्त केली. देशात दरवर्षी५ लाख अपघात होतात, आणि १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो, असे गडकरी यांनी सांगितले.







अपघातामध्ये ६० टक्के प्रकरणांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील लोकांना आपला जीव गमवावा लागतो, ज्यामुळे आपल्या जीडीपीचे ३.१४ टक्के नुकसान होते आणि ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गड़करी यांनी व्यक्त केली.
तसेच आज राज्यसभेत गुलाम अली यांनी रस्ते अपघातासंदरभात प्रश्न उपस्थित केला. यावर नितीन गड़करी यांनी आज राज्यसभेत ट्रक आणि वाहनांना महामागावरील अपघातांपासून वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला.
नितीन गड़करी म्हणाले की, डोंगराळ भागात अपघात होतात हेही खरे आहे. पूर्वी क्रेश बॅरिअर्स लोखंडाचे असायचे. आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉक्रिटमध्ये एम्बेड केले जाते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर पडण्याऐवजी मागे येतो. या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोगराळ भागात असे अपघात होतात. असे प्रयोग आम्ही काही ठिकाणी केल्याचे सांगितले. त्याचा वापर करून असे अपघात कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करत असल्याचे गड़करी म्हणाले.








