राज्यातील लोकप्रतिनिधींना मिळणार 40 मजली आमदार निवास…

0
slider_4552

मुंबई :

राज्यातील लोकप्रतिनिधींना आता ४० मजली आमदार निवास मिळणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा आजपार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोच्हे आदी उपस्थित होते.

यावेळी नार्वेकरांनी या आमदार निवासाची वैशिष्ट्ट सांगितली. नार्वेकर म्हणाले, राज्यात आमदारांच्या राहण्याची व्यवस्थित व्यवस्था नव्हती त्यामुळ नवं ‘मनोरा’ आमदार निवास बनवण्यात येणार आहे. यासाठी ४০ आणि २८ अशा दोन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये ३६८ निवासी अपार्टमेंट असणार आहेत. तसेच प्रत्येत अपार्टमेंट हे १ हजार स्केअर फुटांचं असेल.

है आमदार निवास विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे. यामध्ये ८५০ गाड्यांसाठी पार्किंग, कल्ब हाऊस, जिम्नशिअम, कॉन्फरन्स हॉल, रेस्टरॉ अशा अनेक अत्याधुनिक सुविधा या आमदार निवासामध्ये असणार आहे. यामुळे सर्व आमदारांना एकाच ठिकाणी राहता येणं शक्य होणार आहे. समुद्राला लागून असलेल्या या नव्या आमदार निवासाच्या कामासाठी सुमारे पाच वर्षाचा विलंब झाला आहे. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. या अडचणींमध्ये सीआरझेडचे कायदे, अधिकचा एफएसआयमुळं प्लॅनमध्ये बदल झाला होता.

यामध्ये खर्चातही वाढ़ झाली आहे. पुढील अडीच वर्षात याचं कामकाज पूर्ण होईल, अशी माहितीही नावेंकर यांनी दिली आहे.आजपर्यंत विविध पाच ठिकाणी आमदारांना ठेवण्याची सोय केली जात आहे. यामध्ये मेँंजेस्टिक आमदार निवास, विस्तारीत आमदार निवास, आकाशवाणी निवास, मनोरा आमदार निवास यांचा समावेश होता. जागा अपुरी पडत असल्यानं नव्या आमदार निवासाची निकड भासत होती.

See also  देशातील तुरुंगाचे खासगीकरण झाले आहे का? : संजय राऊत