पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर
असताना टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती.त्यानंतर टेस्ला लवकरच भारतात आपल्या प्रकल्प उभारणीस सुरुवात करेल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता टेस्ला पुण्यातील विमाननगर भागात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
टेस्ला भारतात आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी सज्ज आहे. टेस्ला कंपनी आता पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे आपल्या कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली आहे. टेस्ला अधिकाच्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील इलेक्ट्रिक कारच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती. टेस्ला कंपनीने पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर 5580 चौरस फूट कार्यालयाची जागा घेतली आहे.
टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सोबत हा करार करण्यात आला आहे. त्याचे भाडे 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि दोन्ही कंपन्यांनी दरवर्षी 5 टक्के वाढीसह 36 महिन्यांच्या लॉक-इन कालावधीवर सहमती दर्शवली आहे. या कंपनीची इच्छा असल्यास ती
आणखी पाच वर्षासाठी लीज वाढवू शकते. टेस्ला 60 महिन्यांसाठी जागा भाड्याने देण्यासाठी 11.65 लाख रुपये
मासिक भाडे आणि 34.95 लाख रुपये डिपॉझिट भरणार आहे. ही जागा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे.