पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड़्या रविवारी रद्द ; कोेणत्या ट्रेन धावणार नाहीत; जाणून घ्या

0
slider_4552

पुणे  :

पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तांत्रिक कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाच्या एकूण 12 रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी लोकल रेल्वे गाङ्या बंद राहणार आहेत.

पुर्ण रेल्वे स्थानकातून लोणावळ्याच्या दिशेने जाणाच्या 12 गाड्या तर पुण्याच्यादिशेने येणाच्या 12 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-लोणावळा, पुणे-तळेगाव, डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाङ्यादेखील रविवारी धावणार नाहीत.

विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण मुंबईहुन पुण्याला जातात किंवा पुण्याहून मुंबईत प्रवास करुन येतात. या दोन दिवशी मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अशा परिस्थितीत आता अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

 पुणे अप मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत

पुणे- लोणावळा (वेळ 7.15) पुणे – तळेगांव (वेळ 7.38)

शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 8.50 ) पुणे – तळेगांव (वेळ 9.43)

पुणे- लोणावळा (वेळ 10.42) पुणे – लोणावळा (वेळ 12.02 पुणे

– लोणावळा (वेळ 15.45) डेक्कन एक्सप्रेस (वेळ 15.57) पुणे-

तळेगांव (वेळ 16.32) कोयना एक्सप्रेस (वेळ 16.42) पुणे-

लोणावळा (वेळ 17.10) शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 17.56)

पुणे डाऊन मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत

 

लोणावळा – शिवाजीनगर (वेळ ६.५६) तळेगांव – पुणे (वेळ 7.48)

लोणावळा – पुणे (वेळ 7.53) लोणावळा – पुणे (वेळ 8.46)

तळेगांव – पुणे (वेळ 9.57) डेक्कन एक्सप्रेस (वेळ 10.10)

लोणावळा – शिवाजीनगर (वेळ 10.31) कोयना एक्सप्रेस (वेळ

11.35) लोणावळा – पुणे (वेळ 15.16) तळेगांव-पुणे (वेळ 16.40)

लोणावळा – पुणे (वेळ 19.25)

See also  किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपी भानू खळदे याची येरवडा कारागूहात रवानगी