पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांसाठी  महत्त्वाची व तातडीची माहिती

0
slider_4552

मुंबई  :

पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीमध्ये लाखों लोकांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती. चांगला परतावा व पर्यटन क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिक हॉलिडे निवास व इतर लाभ देण्यात येतील असे ग्राहकाना आश्वासित केल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुतवणूक केली होती.

सन २०१५ मध्ये पॅनकार्ड क्लबच्या गैरव्यवस्थापन या कारणांमुळे सेबीच्या आदेशानुसार पॅनकार्ड क्लबचे कामकाज बंद पाड़ले. याबाबत सुनावणी होऊन मे . उच्च न्यायालयाने पॅनकार्ड कंपनी पुनर्रसंचालित करून चलविण्याच्या हेतूने मे. एनसीएलटी नॅशनल कंपनी लॉ ट्राइब्युनल सदर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पारित केले. N.C.L.T ने आता सदर प्रक्रिया सुरु करून इच्छूक उद्योजकांच्या कंपण्यांकडून प्रस्ताव मागविले. आलेल्या अनेक प्रस्तावामधून अटी व शर्तिचे पालन करू शकणाऱ्या तीन कंपन्यांची निवड झाली.

पात्र ठरलेल्या तीन कंपन्यामध्ये सर्वाधिक किमतीच्या सुमारे १२४५ कोटी रु. चा प्रस्ताव शांती हॉस्पीटेलिटी या कंपनीने दिला आहे. सदर प्रस्ताव गुंतवणूकदारांच्या अधिक हिताचा आहे. तसेच कंपनी पुनरसंचालीत होण्याच्या दृष्टीने उत्तम आहे असे या क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे. यातील महत्वाचा भाग असा की, शांती हॉस्पीटॉलिटी ही एकमेव कंपनी पॅनकार्डक्लब कंपनीच्या मालमत्ता विकून टाकणार नसून कंपनीचे काम पूर्ववत सुरु करून सुस्थितीत नेणार आहे. तसेच कंपनीचे कर्मचारी व मार्केटिंग प्रतिनिर्धीनाही या कामांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

यासाठी गुंतवणूकदाराना पुढील लिंकवर जाऊन २७ तारखे पुर्वी आपले मत नोंदवावे लागनार आहे.

Voting link:-

https://evoting.dcirrus.io/apprnew/poll_single.html?p=35&c=792

Voting instructions:-

https://www.cirppancardclubs.com/_files/ugd/41de1f_0ac9d5196c914694a9344c৪cac729af2.pdf

See also  उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात शाब्दिक चकमक