बाणेर, पाषाण परिसरात दहीहंडी उत्साहात साजरी.

0
slider_4552

बाणेर :

अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व्यापारी संघटना, आयोजित दहीहंडी उत्सवात चंद्रयान तीन चा देखावा साकारण्यात आला होता. मंडळाचे हे ११ वर्ष होते. यावर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान ईश्वर नगरचा राजा गोविंदा पथक, नवी मुंबई यांनी पटकावला. पाच थर लावून दहीहंडी फोडण्यात आली.

दहीहंडी निमित्त कोथरूड मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्व गोपाळ भक्तांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी फोडल्यानंतर चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय बालाजी पांढरे, क्राईम पी आय जानकर साहेब व माजी एसीपी भानुप्रताप बर्गे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी मंडळाला सन्मानित केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने बाणेर बालेवाडी महाळुंगे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यकारणी प्रकाश तापकीर, मंदार पोरे, विनायक चिव्हे, अक्षय तापकीर, पंकज तापकीर, वैभव तापकीर आदी उपस्थित होते.

 

पाषाण :

रायगड ग्रुप निम्हण मळा पाषाण यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव व विविध सांस्कृतिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक उर्मिला फुलमाळी (टिव्ही) , द्वितीय क्रमांक अश्विनी दआशळ (पैठणी), तृतीय क्रमांक काजल लिंबोळे (कपाट), चतुर्थ क्रमांक उर्मिला कुरकुटे (मिक्सर) या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, तानाजी निम्हण,रोहन कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संतोष निम्हण ,राजू निम्हण, प्रसाद निम्हण, सचिन निम्हण, पंकज शिंदे, धीरज शिंदे योगेश आगलावे यश निम्हण, अथर्व निम्हण ,तात्या खरोसे, साहिल गायकवाड, रोहित मेघावत, सनी जगधने, मयूर निम्हण,अंकुश ससाणे, संदीप निम्हण ,प्रतीक पवार सौरभ निम्हण आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

See also  सचिन दळवी यांच्या वतीने पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब रुग्णांना संजीवनी देण्याकरिता आर्थिक मदत...