चेन्नई :
१९६० च्या दशकात भारतात आलेल्या हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकन्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.







त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्वाच्या पदांवर अपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. २०০४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं. एम. एस. स्वामीनाथन यांचा १९८७ साली पहिल्या विश्व अन्न पुरस्काराने (World Food Prize) सन्मान करण्यात आला. यानंतर स्वामीनाथन यांनी चेन्नईमध्ये एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापनाही केली.
एम. एस. स्वामीनाथन यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय एच. के.फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त त्यांना रमन मेंगसेसे पुरस्कार (१९७१) व अल्बट आईनस्टाईन वल्ड सायन्स अवॉर्ड (१९८६) हे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कारही मिळाले होते.








