दहीहंडी कालावधीत अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस

0
slider_4552

पुणे :

दहीहंडीच्या काळात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता पाण्याच्या बाटलिच्या जाहिरातीचे सुमारे अडीच हजार जाहिरात फलक लावणे पडले महागात.

दहीहंडीच्या काळात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता पाण्याच्या बाटलिच्या जाहिरातीचे सुमारे अडीच हजार जाहिरात फलक लावणे महागात पड़ले आहे. शहराचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने उद्योगपती पुनीत बालन यांना ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्यास दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र है सण सार्वजनिक पद्धतीने साजरे केले जातात, ्यासाठी मंडळांना कंपन्यां कडून जाहिराती दिल्या जातात. राज्य सरकारने गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवाच्या काळातील मांडव शुल्क, परवाना शुल्क जाहिरात शुल्क माफ केले आहे. पण दहीहंडी व नवरात्र उत्सवासाठी शुल्क भरावे लागते. बालन यांच्याकड्न ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर कालावधीमध्ये शहरातील पेठांमधील प्रमुख रस्ते, चौक ऐतिहासिक ठिकाणे यासह इतर ठिकाणी दहीहंडी निमित्ताने बालन यांच्यातर्फे जाहिरात फलक लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडुन प्रशासनाकड़े तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच समाज माध्यमावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

महापालिकेच्या परवाना निरीक्षकांनी शहरात फिरून पाहणी केली असता त्यामध्ये ४ बाय ८ आकाराचे अंदाजे २ हजार ५০০ जाहिरात फलक आनधिकृतपर्णे लावून विद्रूपीकरण केल्याचे दिसून आले. महापालिकेच्या नियमानुसार प्रत्येक जाहिरात फलकाला प्रतिदिन ४० रुपये इतके शुल्क आहे. त्यानुसार ८o हजार चौरिस फुटासाठी १० दिवसाप्रमाणे ३ कोटी २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

दहीहंडीच्या काळात परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्याने महापालिकेने नोटीस बजावली असून, ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड केला आहे. नोटीस मिळाल्यानंतर दोन दिवसात ही रक्कम न भरल्यास मिळकतकरातून ही रक्कम वसूल केली जाईल. – माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग

See also  पुणे महापालिका बरखास्तीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर...