पुणे :
अस्थायी आस्थापनेवर औद्योगिक प्रशिक्षण (ITI) घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यास मुदतवाढ देण्यात आली. इच्छुक पात्र उमेदवारांनी 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावरील लिंकद्वारे अर्ज भरावेत असे आवाहन महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.







शिकाऊ उमेदवारांच्या 1 वर्ष कालावधी करीता सन 2023-24 साठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत 27 ऑक्टोबर 2023 रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये महापालिकेच्या विविध विभागात कोपा-पासा, इलेक्ट्रिशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन अँड वातानुकुलन मेकॅनिक, प्लंबर, डी.टी.पी, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्रॉट्समन सिव्हील, सर्व्हेअर व मोटार व्हेईकल मेकॅनिक इत्यादी 11 व्यवसायांच्या एकूण 303 जागा आरक्षणनिहाय उपलब्ध आहे.
ही जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या कालावधीला 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरील जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावरील लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरून 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत सदर अर्जाचे प्रत्यक्ष कागदपत्रे आय. टी. आय मोरवाडी येथे जमा करावित असे आवाहन, विभागाचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले आहे.








