पुणे :
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) 2024 साठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 28 नोव्हेंबर पर्यंत विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करता येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे (HSC form) सादर करण्यासाठी दिलेली मुदत 20 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबर पासून विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करता येतील. 21 ते 28 नोव्हेंबर पर्यत ही मुदत असेल.
बारावीच्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदनपत्र भरता येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांची विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर करण्याची मुदत 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत आहे.
यापुढे आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरण्याच्या तारखांना कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच आवेदनपत्रे अतिविलंब शुल्काने सादर करण्याच्या तारखा यशावकाश कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.