आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरसाठी 5000 बस सोडण्याचे नियोजन

0
slider_4552

पुणे :

आषाढी एकादशीसाठी देहूु आणि आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत. त्याच बरोबरराज्यभरातून विविध संतांच्या पालख्या देखील पंढरपूरकडे येत आहेत. हा सोहळा आनंदाने साजरा होण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक भागातील भाविकाला पंढरपूरला पोहोचता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने देखील जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. राज्यभरातून पंढरपूरसाठी 5000 बस सोडण्यात येणार आहेत.

*मागील त्यांना बस*

एसटी महामंडळाने यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्याच्या विविध आगारांमधून बस सोडल्या जाणार आहेत. त्यासह एखाद्या गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांनी एकत्रित बसची मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरला जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे भाविकांना अतिशय सहजपणे पंढरपूर येथे जाता येणार आहे.

*सवलतींचाही लाभ मिळणार*

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून विविध सवलत योजना राबविल्या जात आहेत. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या जादा बस मध्ये देखील या सवलती प्रवाशांना मिळणार आहेत. त्याचबरोबर 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित बसची मागणी केल्यास त्या बसमध्ये देखील तिकिटाच्या सर्व सवलती मिळणार आहेत. 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

*फुकट्या प्रवाशांचा बंदोबस्त*

एसटीने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटी महामंडळाने चोख नियोजन केले आहे. पंढरपूरकडे जाणाच्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार आहेत. एसटीचे 200 सुरक्षारक्षक कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत.

*पंढरपूरमध्ये तात्पूर्त्ती चार बस स्थानके*

महामंडळाच्या विविध विभागांमधून बस सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे भाविकांची गर्दी पाहता एकाच बस स्थानकावर नियोजन करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे चंद्रभागा, भीमा, वि्ठल कारखाना आणि पांडुरंग अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारली जाणार आहेत. या बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

See also  अरबी समुद्रात 'बिपर जॉय' नावाचे चक्रीवादळ...

*कोणत्या बस कुठे थांबतील*

चंद्रभागा बस स्थानक येथे मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे व पंढरपूर आगार या विभागातील बस थांबतील, भीमा बस स्थानकावर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या विभागातील बस थांबतील, विठ्ठल कारखाना बस स्थानकावर नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर या विभागातील बस थांबतील. तर पांडुरंग बस स्थानकावर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागातील बस थांबतील.