पुणे :
पीएमपीएमएल कडून मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवासी यांचेसाठी मेट्रो स्टेशन पासून इच्छित स्थळी जाणे करिता रामवाडी मेट्रो स्टेशन ते ईऑन आयटी पार्क, खराडी या मेट्रो फिडर बससेवेचा विस्तार इंटरनॅशनल टेक पार्क, खराडी पर्यंत करण्यात आला आहे.
या विस्तारीत बससेवेचा शुभारंभ पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
पीएमपीएमएल कडून सुरु करण्यात येत असलेल्या फीडर बससेवेमुळे प्रवाशी नागरिकांना मेट्रो स्टेशन्स र्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे.
याप्रसंगी पुणे महामेट्रोचे महाव्यवस्थापक (एम.एम.आय.) कॅप्टन राजेंद्र सनेर-पाटील, उपमहाव्यवस्थापक मनोज डॅनियल, कॅपिटालॅण्डचे व्हाईस प्रेसिडेंट ऋषिकेश राजहंस, सिनिअर मॅनेजर हेड अनिकेत फटाले, मार्केटिंग मॅनेजर हेड सुमित कुमार, पीएमपीएमएल चे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी. सतिश गाटे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी. नारायण करडे, भेकराई नगर डेपो मॅनेजर सुरेंद्र दांगट, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर, वाघोली डेपो मॅनेजर सोमनाथ वाघोले, हडपसर डेपो मॅनेजर दिपक वाळुंजकर, शेवाळेवाडी डेपो मॅनेजर गुलाब गायकवाड आदी उपस्थित होते.