मूल्यव्यवस्था मजबूत करणारे उत्तम प्रशासक डॉ. राजेंद्र झुंजाराव: डॉ.एन.एस. उमराणी 

0
slider_4552

पुणे :

२०४७ साली विकसित भारत घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांना अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेत केंद्रीभूत ठेवणे आवश्यक आहे. मॉडर्न महाविद्यालय हे केवळ महाविद्यालय नाही तर विद्यापीठाची क्षमता असलेले विद्यापीठ आहे असे उद्गार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ५ या महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या “सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी काढले.

डॉ.राजेंद्र झुंजारराव हे उत्तम प्रशासक असून सर्वसमावेशकता आणि वैविध्यता हे गुण त्यांच्याकडे आहेत.महाविद्यालयातील मूल्यव्यवस्था मजबूत करण्यात , उत्तमतेचा ध्यास घेण्यात प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजाराव अग्रस्थानी आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा. प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सतत उंच ठेवण्याचे कार्य प्रा.डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी केले असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. महाविद्यालय आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात प्राचार्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.प्राचार्यांची एकूणच कारकिर्द समाधानकारक राहिली,अतिशय सौम्य आणि नम्र राहून त्यांनी महाविद्यालयाचा कार्यभार सांभाळला असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये काढले.

सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्यासाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह मा. प्रा. शामकांत देशमुख सर यांनी केले.सरांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी सरांच्या महाविद्यालयातील 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकालावर आधारित तयार केलेली चित्रफित दाखवण्यात आली. प्रा. समीर नेर्लेकर , यांनी ही चित्रफित तयार केली आहे. यावेळी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापकांच्या वतीने डॉ.अमृता ओक यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयातील शिक्षकेतर सहकाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत महाविद्यालायचे प्रबंधक गणेश साठे यांनी व्यक्त केले. मॉडर्न महाविद्यालयाच्या नवनियुक्त प्राचार्या आदरणीय डॉ. निवेदिता एकबोटे आपले मनोगत व्यक्त केले. मॉडर्न महाविद्यालय आणि प्राचार्य यांचा असलेला घनिष्ठ संबंध आणि महाविद्यालयाची झालेली यशस्वी घोडदौड महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. झुंजारराव  पीएचडी मार्गदर्शक असलेले आदरणीय डॉ. अरविंद पांडे  यावेळी उपस्थित होते.त्यांनी प्राचार्य झुंजारराव सरांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.

See also  पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्प लवकरच पुर्ण होणार : गिरीश बापट

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीया सहकार्यवाह प्रा.डॉ.सौ.ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी नेहमीच अत्यंत सामंजस्याने महाविद्यालयातील प्रशासन हाताळले असे मत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी आपल्या कार्याप्रती, संस्थेप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. डॉ. सौ. अंजली सरदेसाई यांनी केले. स्वाती पटवर्धन,  रेणू भालेराव यांनी पसायदान सादर केले. सूत्रसंचालन डॉ.वैजयंती जाधव यांनी केले.