गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात आज
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिननिमित्त वंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने झाली.

प्राचार्य डॉ संजय खरात प्रास्ताविक करताना म्हणाले ‘ परिवर्तनाचे विचार आणि त्यांना प्रोत्साहन देणारी माणसेही महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आली. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांची गाथा, समतेची शिकवण देणारे महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्याला जाहीर साद घालणारे लोकमान्य टिळक हे महाराष्ट्र मध्ये जन्माला आले. महाराष्ट्र भूमी परिवर्तनची भूमी आहे.

परिवर्तनाचे आधारस्तंभ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्व विषयात तज्ञ होते. नीती आयोग पासून ते पर्यावरण संवर्धन पर्यन्त प्रत्येक क्षेत्रात त्याचा सखोल अभ्यास होता. ते उत्तम चित्रकार होते. संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पूजाला होता त्यांनी
भारत भूमिमध्ये मनावासाठी संघर्ष केला. डॉ आंबेडकर हे जगाचे नेते होते. त्यांना कुठल्याही साच्यात बसवू नका. जाती विरहित समाज निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता.
त्यांना अपेक्षित असलेला समाजाचा विकास झाला तर ती त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यांच्या कार्याचा विचार व्हावा.

डॉ श्वेता सावळे इतिहास विभाग प्रमुख म्हणाल्या, त्यांनी अनेक बौद्धिक क्षेत्रे काबीज केली. स्त्री विषयावर डॉ आंबेडकर यांनी
हिंदू स्त्री बिल आणले. त्याची भूमिका मांडताना
स्त्री उच्चवर्णीय असुदे किंवा सामान्य असू दे ती शोषित आहे. स्त्री जीवन जो पर्यंत सुधारत नाही तो पर्यंत समाज सुधारणार नाही. हा त्यांचा विचार हा समतावादी होता. अनेकांनी आंबेडकरीय विचारांच्या अनेक प्रतिभा रंगवली आहे. त्याचे पैलू अलगडताना धर्म जाती प्रदेश या सीमा ओलांडल्या पाहिजेत
असे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी बुध्दवंदना डॉ रवींद्र क्षीरसागर, प्रा महेंद्र वाघमारे, प्रा सवाई शिक्रे यांनी केली. उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ श्वेता ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले.

See also  एटीएस ने जप्त केली पुण्यात ड्रग्स